Madhusheth Thakur Alibag

Madhusheth Thakur Alibag Madhusheth Thakur Alibag
0 72.867082

no images yet

SHARE WITH OTHERS
SITE SENSE TAGS
See new updates

Madhusheth Thakur Alibag

Latest Updates

रायगडमधील सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणात सहायक निबंधक विठ्ठल सुर्यवंशी यांनी घोटाळा केल्याचा माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा आरोप
रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यासोबतच जिल्हा बॅंकेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी
सुर्यवंशी यांची तात्काळ रायगड जिल्हयाबाहेर बदली करण्याची मागणी.
रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे मतदार वाढविण्यासाठी बोगस सहकारी संस्था तयार केल्याच्या तक्रारींबाबत राज्य शासनाकडून चैकशी सुरू
अलिबाग - रायगडमधील सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणात घोटाळा झाला असल्याचा आरोप अलिबागचे काॅंग्रेसचे आमदार मधुकर ठाकूर यांनी केला असून सहकारी संस्था सर्वेक्षणामध्ये झालेल्या अफरातफरीबाबत तसेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे मतदार वाढविण्यासाठी बोगस सहकारी संस्था तयार केल्याच्या तक्रारींबाबत राज्य शासनाकडून चैकशी सुरू असल्याने ही चैकशी पूर्ण झाल्यावरच रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यांत यावा अथवा संचालक मंडळाचा कालावधी पूर्ण होत आला असल्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर प्रशासक नियुक्त करण्यात यावा अशी मागणी ठाकूर यांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या आयुक्तांकडे तसेच शासनाकडे केली आहे. आज ए.आर.अंतुले काॅंग्रेस भुवन, अलिबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे जेष्ठ नेते रमेश नाईक, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी हर्षल पाटील, अॅड.सागर पाटील, तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी, योगेश मगर, ओबीसी सेल अध्यक्ष सुनील थळे, विभागीय अध्यक्ष वैभव पाटील इ.उपस्थित होते. मधुकर ठाकूर यांच्या तक्रारीनंतर शासनाकडून विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग यांची प्राधिकृत चैकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली गेली असून त्यांचेकडून चैकशी अहवाल विहीत मुदतीमध्ये सादर करण्याबाबत त्यांना आदेशीत करण्यंात आले आहे. सहकारी संस्थांचे सभासदांनी प्राधिकृत केलेला संचालक हा रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवणूकीमधील मतदार असल्याने सर्वेक्षणामध्ये काही बोगस सहकारी संस्था आस्तीत्वात असल्याचे खोटेच दर्शविले असल्याच्या तक्रारी असल्याने रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवणूक पुढे ढकलण्यासोबतच बॅंकेवर प्रशासक नेमण्याची मागणी ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. सन 2015-16 या या कालावधीमध्ये शासन आदेशानुसार सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. अलिबाग तालुक्यात 31 मार्च 2015 अखेर 682 सहकारी संस्था आस्तीत्वात होत्या शासनाच्या संस्थाच्या सर्वेक्षणाच्या आदेशानंतर यामधील फक्त 70 संस्था अंतिम विसर्जीत करून 31 मार्च 2016 अखेर 633 संस्था आस्तित्वात असल्याचे सहायक निबंधक सुर्यवंशी यांनी शासनाला कळविले आहे. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार यामधील निम्म्यापेक्षा जास्त संस्था आस्तीत्वात नसल्याचे सर्वेक्षण सुर्यवंशी यांच्याच विभागाने केले होते मग फक्त 70 संस्थाच बंद करण्याचा सुर्यवंशी यांचा निर्णय हा एका राजकीय पक्षाला फायदेशीर ठरण्यासाठी घेण्यात आला असून याबाबत सुर्यवंशी यांची चैकशी शासनाने सुरू केली असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकाचे मतदार होऊन निवडणुकीत लाभ करून घेण्यासाठी मोठया प्रमाणात बोगस सहकारी संस्था स्थापन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वेक्षणात ज्या संस्था बंद आहेत त्या अवसायनात घेवून त्यांच्यावर नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्याच्या सहकार खात्याच्या सूचना होत्या. परंतु रायगडमध्ये काही भ्रष्ट सहकार अधिका-यांनी या सर्वेक्षणामध्येही घोटाळा केल्याच्या तक्रारी असल्याने काॅंग्रेसचे अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती. ठाकूर यांना ही माहिती देण्यासही सहकार विभागाचे सहायक निबधंक श्री.विठ्ठल सुर्यवंशी यांनी सुमारे सहा महिने टाळाटाळ केली. ठाकूर यांनी त्यांच्याकडे सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली होती. श्री.सुर्यवंशी यांनी काही महिने माहिती देण्यास टाळाटाळ केली. विशेष म्हणजे हीच माहिती जिल्हा उपनिबंधक व जिल्हयातील इतर सहा.निबंधक यांनी ठाकूर यांना तात्काळ उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे श्री.सुर्यवंशी यांनी या सर्वेक्षणामध्ये बनावटगिरी केली असल्याचा संशय ठाकूर यांना आला. ठाकूर यांनी त्यांच्या अर्जाप्रकरणी सतत पाठपुरावा केल्यानंतर .सुर्यवंशी यांनी सदरची माहिती ठाकूर यांना दिली. सदर माहितीचे अवलोकन करता सुर्यवंशी यांनी या सर्वेक्षणामध्ये प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर कृत्ये केली असल्याचे मधुकर ठाकूर यांना आढळून आले. अनेक सहकारी संस्था प्रत्यक्षात आस्तीत्वात नसून त्यामधील काही तर बनावट आहेत. काही ठीकाणी सर्वेक्षण करणा-या सहकार विभागाच्या अधिका-यांनी सदरची संस्था बंद आहे, संस्थेचे कार्यालय नाही तसेच गावामध्ये अशा प्रकारची संस्था कधी आस्तीत्वातच नव्हती असे ग्रामस्थांनी सांगीतल्याचे अहवाल असूनही श्री.सुर्यवंशी यांनी राजकीय नेत्याच्या दबावाखाली व स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी सदर संस्था प्रथम अवसायानात घेण्याचे आदेश पारीत केले तेच आदेश काही महिन्यांनी रद्द करून संस्थांच्या पदाधिका-यांशी फोनवर चर्चा केली असे खोटेच दाखवून या संस्था पुर्नस्थापीत केल्या आहेत. विशेष म्हणजे श्री.सुर्यवंशी यांनी या आदेशामध्ये संस्थेच्या कोणत्याही पदाधिका-याचे नाव दिलेले नाही. सर्वसाधारण संस्था, विकास संस्था, नागरी ग्रामीण संस्था, भाजीपाला सहकारी संस्था यांचे केवळ कागदोपत्री अस्तीत्व दर्शविण्याचे बेकायदेशीर व बनावट काम श्री.सुर्यवंशी यांनी पुढील वर्षी होणा-या रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीसाठी एका राजकीय पक्षाच्या पुढा-यासाठी केले असल्याची तक्रार मधुकर ठाकूर यांनी आयुक्त व निबंधक सहकार विभाग, महाराष्ट् राज्य यांच्याकडे दाखल केली आहे. सुर्यवंशी यंानी केलेले संस्थांचे सर्वेक्षण पुर्णपणे बनावट आहे याची प्रमुख उदाहरणे कागदपत्रांसह पत्रकार परिषदेमध्ये सादर करताना मधुकर ठाकूर यांनी सांगितले की, काही सर्वेक्षण फाॅर्मवर सहकार अधिका-यांच्या सहयाच नसून संस्थेच्या पदाधिका-याची स्वाक्षरी दर्शविली आहे. काही सर्वेक्षण फाॅर्म तर चक्क कोरेच आहेत. संस्थेचा नोंदणीकृत पत्ता एका गावात तर संस्थेचे सर्वेक्षण दुस-या गावात दाखविले आहे. सुर्यवंशी यांचे सर्वेक्षण बनावट असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील जनसेवा पर्यटन विकास सहकारी संस्था नोंदणी 89, दि. 30/09/1989 ही संस्था नांेदणी पत्त्यावर नसल्याने दि. 30/09/2015 रोजी ही संस्था रद्द करण्याचे मध्यंतरीय आदेश श्री.सुर्यवंशी यांनी पारित केले. नंतर दि. 02/12/2015 च्या आदेशाने ते कायम केले व ही संस्था कायमची रद्द करण्यात आली आहे असे आदेश राजपत्रामध्ये प्रसिध्दीसाठीही पाठविले. या सगळयावर कळस म्हणजे श्री.सुर्यवंशी यंानी कायम रद्द केलेली संस्था त्यांच्याच दि. 09/12/2015 च्या आदेशाने पुर्नस्थापीत केली आहे. या दि. 09/12/2015 च्या आदेशामध्ये दि. 30/09/2015 चे मध्यंतरीय आदेश व दि. दि. 02/12/2015 चे अंतिम आदेशाचे काय झाले याचा कोणताही उल्लेख श्री.सुर्यवंशी यांनी केलेला नाही. संस्थेची नोंदणी रद्द करण्याचे कायम आदेश राजपत्रामध्ये प्रसिध्द करण्यांत आल्यावर सदरची संस्था पुर्नस्थापीत करण्याचा अधिकार श्री.सुर्यवंशी यांना नाही तरीही त्यांनी ही संस्था पुनस्थापीत केली आहे. अलिबाग तालुक्यात दि. 31/03/2015 पर्यंत 22 भाजीपाला संस्थांची नोंद होती. श्री.सुर्यवंशी यंानी दि. 30 जानेवारी 2016 या एकाच दिवशी नवीन 13 भाजीपाला सहकारी संस्थांची नोंदणी केली आहे. मुळात पुर्वीच्या 22 भाजीपाला संस्थांच त्या त्या गावात आस्तित्वात नसल्याचे सवेक्षणामध्ये तसेच त्या गावातील ग्रामस्थांच्या जबाबामध्ये स्पष्ट झाले असूनही एकाच दिवशी 13 नवीन भाजीपाला संस्था नोंदणी करून श्री.सुर्यवंशी यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या 2017 मध्ये होणा-या निवडणूकीसाठी स्थानिक राजकीय नेत्यांसाठी ही सर्व बनावटगिरी केली आहे..सुर्यवंशी यंानी केलेले संस्थांचे सर्वेक्षण पुर्णपणे बनावट असल्याने हे सर्वेक्षण पुन्हा विभागीय निबधंक यांनी स्वतःच्या देखरेखीखाली करावे अशी मागणी मधुकर ठाकूर यंनी शासनाकडे केल असून स्थानिक सहकारी अधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करीत असल्याने स्थानिक अधिका-याची नेमणूक न करता शासनाने विभागीय स्तरावरील अधिका-याची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग यांनी विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली असून त्यांचेकडून चैकशी अहवाल विहीत मुदतीमध्ये सादर करण्याबाबत त्यांना आदेशीत करण्यंात आले आहे. भारतीय संविधानाच्या, (97जी सुधारणा) अधिनियम, 2011 नुसार, लेख 243 झेड.के. नुसार सहकारी संस्थाच्या निवडणूका निर्भय व पारदर्शी पार पाडण्यासाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यांत आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकांमध्ये बोगस सहकारी संस्थांनी मतदार म्हणून भाग घेवू नये यासाठी बोगस सहकारी संस्था तयार केल्याच्या तक्रारींबाबत राज्य शासनाकडून सुरू असलेली चैकशी पूर्ण झाल्यावरच रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावी अथवा चैकशी दरम्यान रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे अत्यावशक असल्यास रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकवर चैकशी अहवाल प्राप्त होवून शासनाने त्यावर निर्णय घेईपर्यंत प्रशासक नियुक्त करण्यात यावा अशी मागणी मधुकर ठाकूर यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व शासनाकडे केल्यामुळे लवकरच होवू घातलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच अलिबागचे सहायक निबंधक श्री. विठ्ठल सुर्यवंशी हे राजकीय आशीर्वादाखाली गेली 9 वर्षे रायगड या एकाच जिल्हयात कार्यरत असल्याने त्यांची तात्काळ जिल्हयाबाहेर बदली करण्याची मागणीही ठाकूर यंानी केली आहे
रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या गैरव्यवहाराचे तपासणी बाबत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या तक्रारीनुसार रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची महाराष्ट् सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 89 (अे) अन्वये तपासणी सुरू करण्याचे आदेश शासनाने केले होते. जिल्हा बॅंकेचे चेअरमन आ.जयंत पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी सुरूवातील अशी कोणतीही चैकशी सुरू नसल्याचे म्हटले होते. ही चैकशी देखील आता पूर्ण झाली असून हा अहवाल मधुकर ठाकूर यांना शासनाकडून प्राप्त झाला आहे. या चैकशी मध्ये ज्या मुद्दयांची पूर्तता जिल्हा बॅंकेस करावयास सांगितली होती त्याची पूर्तता बॅंकेने अदयाप केलेली नाही.

   Over a month ago
SEND

शिवसेना काॅंग्रेसची चोंढी येथे अभुतपूर्व प्रचारसभा! मानसी महेंद्र दळवीच होणार जि.प.अध्यक्ष !
मधुशेठ ठाकूर, महेंद्र दळवी, विजुभाउ कवळे, अॅड.जे.टी.पाटील, दिपक रानवडे यांची तुफान राजकीय फटकेबाजी!
अलिबाग - राज्यच नाही तर देशभर प्रसिध्द झालेले रायगडमधील काॅंग्रेस सेना आघाडीचे मनोमिलन किती एकरूप झाले आहे याची प्रचिती आज (शनिवारी) चोंढी येथे झालेल्या काॅंग्रेस सेना आघाडीच्या प्रचंड गर्दीमधील प्रचारसभेत दिसून आली. काॅंग्रेसचे अलिबागचे कॅप्टन मधुशेठ ठाकूर व शिवसेनेचे कॅप्टन महेंद्र दळवी हे सुमारे तीन वर्षानंतर एकाच व्यासपिठावर येणार असल्याने लोकांमध्ये या सभेविषयी प्रचंड उत्सुक्ता होती. महेंद्र दळवी यांनी त्यांच्या भाषणात सुरूवातीलाच मधुशेठ ठाकूर हे जेष्ठ नेते असून आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते आम्हाला माफ करतीच असे सांगून या सभेचा सुरच बदलुन टाकला. शेकापला दोघांचीच भिती वाटते एक मधु ठाकुर व दुसरा महेंद्र दळवी, या भितीनेच ते आम्ही दोघे एकत्र येवू नये म्हणून देव पाण्यात ठेवून होते. पण या वेळी भ्रष्टाचारा-यांना घालवायचेच ही मतदारांची प्रामाणीक इच्छा असल्याने काॅंग्रेस व सेना एकत्र आली आहे. काॅंग्रेस नेते अॅड.जे.टी.पाटील यांनी यावेळी शेकापवर टिकास्त्र सोडले, समाजकल्याण या विभागाकडे येणारा कोटववधी निधी अयोग्य पध्दतीने वापरून शेकाप-राष्ट्वादीने हे खाते समाज‘अ’कल्याण असे करून टाकले असल्याची टिका केली. शिवसेना नेते दिपक रानवडेयांनी काॅंग्रेस सेना आघाडी होणे ही काळाची गरज होती ही आघाडी केली नसती तर दोन्ही पक्षाच्या कार्यकत्र्यांनी आपापल्या नेत्यांना उभ्या आयुष्यात माफ केले नसते असे सांगीतले. जेष्ठ नेते विजुभाउ कवळे यांनी या आघाडीमागची भूमिका व्यक्त स्पष्ट केली. शेकापने अलिबाग, पेण, उरण, कर्जत, पनवेल येथील राष्ट्वादी संपविला असून रोहयामधील राष्ट्वादीही काठावर उभी आहे तर सुनील तटकरेंनी रोेहा, महाड, मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन, माणगांव, पोलादपूर, तळा येथीज शेकाप संपविला आहे. त्यामुळे त्यांची आघाडी त्यांनाच लखलाभ होवो आपण मात्र शिवतिर्थावर लोकांच्या मनातील सत्ता आणण्याचे प्रयत्न जोमान करायचे असून यश आपले आहे असे यावेळी सांगितले. मापगांव मतदारसंघातील उमेदवार राजाभाउ ठाकूर व अॅड.श्रध्दा ठाकूर यंानी यावेळी आक्रमकपणे बोलताना ठाकूर कुटूंबीयांवर आरोप करणा-यांचा समाचार घेताना होय आमच्याकडे संपत्ती आहे पण ती लोकांना लुटून जमविलेली नाही ती कष्टाची आहे. आमची संपत्ती आम्ही लपवुन ठेवलेली नाही तुम्ही तुमची संपत्ती लपवून ठेवली आहे म्हणून तुमच्या घरातील सर्वांच्या संपत्तीचे आदेश सरकारने अॅन्टी करप्शन ब्युरोला दिले आहेत असे ठणकावून सांगितले. माजी आमदार मधुशेठ ठाकुर यांनी यावेळी बोलताना शेकाप नेते पराभव्याच्या भितीने एवढया हिन पातळीवर गेले आहेत की माझे तब्बेतीबाबत ठिकठिकाणी बेताल बोलत आहेत. पण कावळयाच्या शापाने गाय मरत नाही हे यांनी लक्षात ठेवावे असा घणाघाती हल्ला यावेळी शेकापवर केला. या प्रसंगी अॅड.प्रविण ठाकूर, काॅंग्रेस-शिवसेनेचे उमेदवारा राजाभाउ ठाकूर, सुषमा म्हात्रे व उनिता थळे, थळ जि.प.उमेवार मानसी दळवी, गजानन बुंदके, उमेश वर्तक, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश घरत, शाखाप्रमुख महेश ठोंबरे, रोहीदास जांभळे, रविनाना ठाकूर, बाळाराम म्हात्रे, सुरेश म्हात्रे, रमेश ठोंबरे, रमाकांत कडवे, गणेश म्हात्रे, मधुकर म्हात्रे, अमृता ठोंबरे, कुंदा ठोंबरे, कृष्णा कडवे, समीर मधुकर ठाकुर, माजी जिप सदस्या रविना ठाकूर, अॅड.प्रविण ठाकूर, भालचंद्र म्हात्रे, तोडणकर गुरूजी, काका ठाकूर, अशोक म्हात्रे, माजी नगरसेविका कविता ठाकूर, नमिता ठाकूर, काजल ठाकूर या विभागातील जेष्ठ काॅंग्रेस नेते, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

   Over a month ago
SEND